वेगवान नाशिक
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद तसेच विविध मुद्द्यांवरुन राज्यात मोठं वाद निर्माण झाला आहे. त्यात मविआ खासदारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली असून यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता या हालचालींना वेग आला असून अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा
CM बोम्मई म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची दि. १४ ला बैठक बोलावली आहे.
दरम्यान मविआ आघाडीच्या खासदारांमध्ये अमित शहा यांच्या झालेल्या भेटीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या वादंगावर तोडगा काढण्याची विनंती केली असून यावर शहांनी सकारात्मक भूमिक घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.
त्यामुळे आता या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
मोठी बातमी! देशात पुन्हा नोटबंदी, ही नोट बंद होणार?