वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे इन्स्टिट्यूटच्या क्रीडांगणावर गेल्या तीन दिवसापासून जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियोजनाखाली 70 व्या पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत पुरुषांचे 45 आणि महिलांचे 12 संघ सहभागी झाले होते.कबड्डी रसिकांनी मोठ्या प्रमाणात अंतिम सामने पाहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.
अंतिम सामना आडगाव येथील ब्रह्मा संघाने नाशिक रोड येथील बालाजी संघाचा 45-28 असा 17 गुणांनी पराभव करत नाशिक जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धेचे विजेतेपद व आमदार सुहास कांदे चषक पटकावला तर महिलांमधून नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने नाशिक रोड येथील बालाजी संघाचा 31-26 असा 5 गुणांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
यातून जिल्हास्तरीय खेळाडूंची निवड करण्यात येणार असून त्यांना नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अंतिम सामन्यानंतर आमदार सुहास कांदे चषक व इतर पारितोषकांचा वितरण समारंभ पार पडला.स्पर्धा संपन्न करण्यासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राजाभाऊ पगारे,मोहन गायकवाड,राजू सूर्यवंशी, किरण गुंजाळ,शरद पाटील,वाल्मिक बागूल,सुधाकर कातकडे,दत्तू जाधव,शिवसेनेचे मयूर बोरसे,सुनील हांडगे,राजाभाऊ भाबड,आप्पा आंधळे,अशोक गरुड, बाळासाहेब जाधव,रहेमान शेख,विलास मोरे,शाकीर शेख,राजू डमरे,रमेश केदारे यांनी सहकार्य केले.