वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तर आता त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली असून आपल्या वक्तव्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा
राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असते. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.
अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर
याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही,असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.
त्यानंतर त्यांनी पत्रात पुढे म्हटले की, आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.
Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा