वेगवान नाशिक
काही दिवसांपासून शिवसेनेच्या चिन्हाबाबत न्यायलयात याचिका प्रकरण सुरू आहे. तर या चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. परंतु त्याआधीच संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.राऊत म्हणाले, ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा
तसेच ‘धनुष्यबाण’ निशाणी आणि ‘शिवसेना’ हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून जिथं उद्धव ठाकरे तीच खरी शिवसेना आहे. आणि तसेही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची जनता आयोगाच्या निर्णयाकडे बघत आहे. जरी एका बाजुने निकाल द्यायचा दबाव निवडणूक आयोगावर आहे, मात्र, तरीही धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
राज्यपालांचे त्या वक्तव्यावरून अमित शहांना पत्र
तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, या दोन्ही ताऱ्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न काल झाला. यापैकी शिवाजी महाराज तर प्रखर सूर्य आहेत, सूर्यावर थुंकणाऱ्यांना व्यासपीठावर बसवण्यात आले होते”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा