मोठी बातमी! देशात पुन्हा नोटबंदी, ही नोट बंद होणार?


वेगवान नाशिक

गेल्या काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर १००० रूपयांची नोट बंद करून २००० रूपयांची नोट चलनात आणली होती. अशातच आता  2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा आरोप करत 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा

याबाबत हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी देशात २००० रूपयांच्या नोटांच्या तुटवड्याचा  मुद्दा उपस्थित केला असून काळा पैसा म्हणून नोटा साठवल्या जात असल्याचा आरोप केला. त्यात गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या 2,000 रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएममधूनही 2 हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे 2 हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात असून सरकारने या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करण्याची करावी अशी मागणी सुशील मोदी यांनी केली आहे.

या फळाच्या शेतीची लागवड करून तुम्ही करू शकता लाखोंची कमाई

तसेच  खासदार मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपायांच्या नोटेची छपाई बंद केली असून 2 हजारांच्या नकली नोटाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर 2 हजाराच्या नोटांचा साठा केला आहे. त्याचा वापर केवळ अवैध धंद्यात होत आहे. त्यामुळे 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी करण्याची मागणी होत आहे.

सध्या भारतात सरकार डिजिटल व्यवहारांवर  भर देत असल्यामुळे  2000 हजार रुपयांच्या नोटेला अर्थ नाही. त्यामुळे सरकारने हळुहळु 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करावी अशी मागणीही सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

Gold Silver Price Today सोने चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *