Nashik चेन स्नॅचिंगसह 6 लाख १० हजारांचा ऐवज लंपास


वेगवान नाशिक

नाशिक : सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडताना दिसत आहे. अशातच त्र्यंबक रोडवर झालेली चेन स्नॅचिंग तर पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडी अशा दोन घटनांमध्ये सहा लाख १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचा कळत न कळत वाद होईल, सावध रहा

मिळालेल्या माहितीनुसार सातपूर मार्गावर हॉटेल डेमक्रसी हॉल परिसरात विवाहाला आलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून  एक जण भिंतीवरून उडी मारुन पसार झाला असून राजश्री रवींद्र बुरकुल (वय ५०, स्वामी कृपा अपार्टमेंट, खोपोली रोड, हनुमान अळी पेण) असे पीडित महिलेचे नाव आहे.

त्या सुनावणीपूर्वीच संजय राऊतांची शिंदे गटावर जोरदार टीका

दरम्यान दि.९ रोजी त्र्यंबक रोड वरील डेमॉक्रसी रिसॉर्ट हॉल येथे बुरकुल या विवाहाला आल्या असता रात्री साडे अकराच्या सुमारास त्या बाहेर पडल्यानंतर एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याच्या सोन्याचे वाट्यांची पोत असा साडे तीन लाखांची सुमारे ८ तोळ्याची सोन्याचे दागिने घेऊन कंपाउंड ओलांडून अंधारात पोबारा केला आहे.  याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर या घटनेतील दुसरी घटना नाशिक पुणे महामार्गावर शिवाजीनगर परिसरात सहकार कॉलनीत घडली असून चोरट्यांनी  घरफोडी करीत सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान अरुण राधु आहिरे (रा. सहकार कॉलनी, जनता शाळेजवळ, शिवाजीनगर) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातून अडीच लाखांची रोकड तसेच, सोन्याच्या चार अंगठ्या असा एकूण तीन लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. 

याप्रकरणी  उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक अतुल पाटील  करत आहेत.

या फळाच्या शेतीची लागवड करून तुम्ही करू शकता लाखोंची कमाई


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *