वेगवान नाशिक
नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 3 वर्षांनंतर शतक झळकावले आहे. त्याने आज रोजी बांगलादेशविरुद्ध चिवट फलंदाजी करताना हे शतक झळकावले असून यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
विराट कोहलीने 54 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला साथ देताना दिसला. 85 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक पूर्ण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 72 वे शतक ठरले. यासह एकूण ७१ आंतरराष्ट्रीय शतके करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आता मागे राहिला आहे.
SBI मध्ये बंपर नोकरीची संधी, एवढ्या जागांसाठी भरती
तसेच भारतीय दिग्गज खेळाडूने वनडे क्रिकेटमध्ये 3 वर्षांनंतर प्रथमच शतकाचा टप्पा गाठला असून विराटने शेवटच्या वेळी ऑगस्ट 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावले होते. तेव्हापासून, त्याने अनेक अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत आणि तीन वेळा 80 च्या वर धावा केल्यानंतर तो बाद झाला आहे. विराटने अखेर पुन्हा आज रोजी बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले.
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता