वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
कबड्डीची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्या मनमाड शहरात 70 वी पुरुष जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा सुरू आहे.पुरुष गटामध्ये ए झोन आणि बी झोन असे झोन पाडून साखळी व बाद पद्धतीने या स्पर्धा खेळविण्यात येत आहेत.
सुरुवातीच्या सत्रामध्ये एकूण 21 संघांनी सहभाग घेतला.यात संघांमध्ये साखळी पद्धतीने स्पर्धा संपन्न झाल्या.त्यामध्ये पहिले 16 संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत.या 16 संघांमध्ये झालेल्या बाद पद्धतीच्या सामन्यामधुन एकूण 8 संघ अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत.त्यामध्ये एकलव्य मनमाड,मनमाड बॉईज मनमाड,रुद्रा स्पोर्ट्स सिन्नर,क्रीडा प्रबोधिनी नाशिक,युवा स्पोर्ट्स सिडको हे संघ दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत.
आज 24 संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात येत आहेत.या स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य वाल्मीक बागुल,रेहमान शेख,विलास मोरे,शाकीर शेख,राजू डमरे,रमेश केदारे व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य व सर्व पंच मंडळ हे अहोरात्र कष्ट घेत आहेत.