सिन्नरः मोहदरी घाटात भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी


वेगवान नाशिक

नाशिकः सध्या नाशिक सिन्नर महामार्गावर सातत्याने अपघात होताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील सिन्नरजवळील मोहदरी घाटात दिनांक ९ रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता

सदर घटना टायर फुटल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाची कार दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसल्याने दोन वाहनांना धडकली असल्याने हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ताफा नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जात होता. त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार लेन ओलांडून पलीकडून येणा-या दोन कारला धडकली असून त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घडलेल्या घटनेतील सर्व विद्यार्थ्यांचे वय 18-20 च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

ई-केवायसी संदर्भात या बॅंकेच्या नियमात मोठा बदल

दरम्यान समोरून येणाऱ्या कारचा चालकही जखमी झाला आहे. तसेच ज्या वाहनाचे टायर फुटले ते महाविद्यालयीन विद्यार्थी होते. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये ३ मुली आणि २ मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले जात आहे.

चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या त्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या या नेत्याची जोरदार टीका

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *