जीएसटी आणि इतर निधी संकलनावरून शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका


वेगवान नाशिक

केंद्र सरकारकडे असलेल्या राज्यांच्या थकबाकीचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येत असतो. मग ती ‘जीएसटी’च्या हिश्श्याची थकीत रक्कम असो अथवा विविध जनहिताच्या योजनांमधील केंद्राचा वाटा असो. अशातच या मुद्द्यावरुन शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर टीका केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता

तसेच पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थकित रक्कम आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमधील दिली जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन हा भीक देण्याचा प्रकार असल्याचं म्हणत टीका केल्याचं समर्थनही शिवसेनेनं केलं असून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राने निधी थकवल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही शिवसेनेनं लक्ष्य केलं आहे.

SBI मध्ये बंपर नोकरीची संधी, एवढ्या जागांसाठी भरती

तर याच मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत, ही राज्यांची थकबाकी नव्हे, तर केंद्र सरकारने राज्यांना भीक देण्यासारखा प्रकार आहे,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर ममता यांचा हा संताप रास्तच आहे, असं म्हणत शिवसेनेनं ममता बॅनर्जींची पाठराखण केली असून शेवटी केंद्राकडे असलेली थकबाकी हा राज्यांचा हक्काचा पैसा आहे. मात्र तो देताना केंद्र सरकारचा आविर्भाव उपकार केल्याचा असतो. पुन्हा तुमच्या सोयीने आणि तुम्हाला वाटेल तितकी रक्कम तुम्ही राज्यांना देणार असाल तर राज्यांनी त्यांचे राजशकट हाकायचे कसे? असा सवाल देखील शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान महाराष्ट्रानेही दिल्लीचा हा आकस यापूर्वी अनुभवला आहेच. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना जीएसटीच्या थकबाकीवरून नेहमीच संघर्ष करावा लागला. अनेक निर्णयांत केंद्र सरकारने खो घालण्याचाच प्रयत्न केला. एकीकडे राज्यांची हक्काची नुकसानभरपाई, हिस्सा थकवायचा आणि दुसरीकडे राज्यांकडील थकबाकीवरून त्यांना कारवाईचे इशारे-नगारे वाजवायचे, असे विद्यमान केंद्र सरकारचे धोरण आहे. म्हणजे केंद्राने थकबाकीवरून राज्यांना धमकावायचे, पण राज्यांनी मात्र केंद्राकडील हक्काच्या थकबाकीबाबत ब्रदेखील काढायचा नाही,असं म्हणत केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवरुन शिवसेनेनं टीका केली आहे.

या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *