वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या सीमाप्रश्नावरून वातावरण चांगलेच चिघळले आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे. त्यात काल गृहमंत्री अमित शाहा यांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार भटले असून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला असून पळपुटे खासदार गप्प बसले. त्यांनी सीमाप्रश्नांवर तोंड देखील उघडले नाही. याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असं म्हटलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
तसेच महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नी वाद वाढलेला असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली नसल्यानेही राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. राभत म्हणाले आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमच्या बापाचं, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. पण आमचे मुख्यमंत्री काय करत आहेत? असा सवाल केला आहे.त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईंना कशाप्रकारे उत्तर देत आहेत? ते लढाईला उतरले आहेत का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा
त्यात बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचं ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत?” असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले हे निर्देश