वेगवान नाशिक
नाशिक : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या घटनांचे प्रमाण वाढले असून सामान्य नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अंबड परिसरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेच्या पतीला सकाळी घरातून अपहरण करून फोनवरून आजच्या आज साडेसात लाख रुपये न दिल्यास तुमच्या पतीच्या किडन्या विकून टाकेल’, अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबल उडाली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
याबाबत अधिक माहिती अशी की, कामठवाडा परिसरात राहणारे भूषण भावसार हे खासगी बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचे काम करतात. त्यानुसार तीन संशयितांनी मोठ्या रकमेच्या कर्जासाठी त्यांच्याकडे कागदपत्रे दिली असता या मंजुरीसाठी संशयितांकडे साडेसात लाख रुपये मागण्यात आले. परंतु, बराच कालावधी उलटूनही कर्ज मंजूर न झाल्याने संशयित भावसारांच्या घरी आले. तिथे तिघांनी भावसार यांच्याशी आर्थिक कारणातून वाद घालून त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून नेले. काही वेळानंतर पत्नी अश्विनी यांनी पती यांना फोन केला असता संशयिताने उचलला असून आजच्या आज माझे साडेसात लाख रुपये दिले नाहितर तुमच्या पतीच्या किडन्या विकून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकणी अंबड पोलिसांत तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन
याबाबत पत्नी अश्विनी भूषण भावसार यांनी अंबड पोलिसांत तीन संशयितांविरुद्ध तक्रार दिली असून संशयित वैभव माने, योगेश देशमुख आणि एका महिलेने अश्विनी यांच्या पतीचे अपहरण करून किडन्या विकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.
याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच अंबड स्थानिक गुन्हेशोध पथकाने त्वरित यंत्रणा कामाला लावत तरुणाची तिघांच्या तावडीतून सुटका केली असून पुढील तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता