वेगवान नाशिक
नाशिकः जिल्ह्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडताना दिसत आहे. नुकत्याच दोन घटना घडून गेल्या असून त्यात तिसरी घटना ही गुजरात राष्ट्रीय महामार्गावर घडल्याचं समोर आलं असून नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र १४८वर आंबेगण फाट्यानजीक एका मालवाहू ट्रकने पेट घेतला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
यासंदर्भात दिनांक १० डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.९ रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिकहून गुजरातकडे जाणारा एक मलवाहू ट्रक आंबेगण फाट्यानजीक अचानक पेट घेतल्याने पुढील भाग संपूर्ण जळून खाक झाला आहे.
यामध्ये परिसरातील नागरिकांनी धाव घेत ट्रक विझवण्याचा प्रयत्न केला मात्र पुढच्या भागामध्ये कॅबिनचा संपूर्ण भाग जळून खाक झाल्याचे दिसून आले. सुदैवाने सदर घटनेत कोणतीही जिवितहानी नसल्याची माहिती आहे.
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले हे निर्देश