Nashik मोबाईल घेण्यासाठी पैसे न देण्याच्या कारणावरून २३ वर्षीय तरूणाची आत्महत्या


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात सध्या आत्महत्या केल्याच्या घटना खूप वाढताना दिसत आहे. अशातच सातपूर परिसरात घटना घडली असून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत अक्षय अरुण खेताडे (23), रा. इस्पाईट हाईट्स, श्रमिकनगर, सातपूर हा तरूण बेरोजगार असून, त्याला मद्याचे व्यसन होते. तर काही दिवसांपूर्वीच त्याचा मोबाईल हरवल्यामुळे तो सतत आई- वडिलांकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. मात्र तो व्यसनी असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नाही.

या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा

याच कारणावरून अक्षयने दि. ९ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास  घराच्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून घेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

सदर घटनेबाबत लक्षात येताच अक्षयच्या कुटुंबाने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले आहे.

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *