मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता


वेगवान नाशिक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असं सांगितलं जात होतं. परंतु तो मंत्रिमंडळ विस्तार आता लांबणीवर पडला असून 26 जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता

दरम्यान  शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री पकडून जवळपास 20 मंत्री आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी शिंदे गटातील आमदार आणि भाजप आमदारांची मागणी होती. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून महामंडळांचं वाटप होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा

विशेष म्हणजे शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असून त्यावरच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत आहेत. आता ही सुनवाणी थेट पुढच्या वर्षांत म्हणजे 13 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हा मंत्रिमंडळ विस्तार 26 जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना खोचक टोला

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील 9 अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. त्यात जानेवारी महिन्यात मुख्य युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. कारण  १७ डिसेंबर ते १ जानेवारी सुप्रीम कोर्टाच्या हिवाळी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे दुस-या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार चांगलाच रखडला जाण्याचे चिन्ह दिसत असून पुढचा विस्तार कधी होणार याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *