वेगवान नाशिक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दि. ११ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
मात्र या उद्घाटनाआधीच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर खोचक टोला लगावला असून मोदींनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला काय दिलासा देणार ते आधी सांगाव त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटनं करावं, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन
त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी उद्या जरुर यावं त्यांनी आमचे कानही टोचावेत तो त्यांचा अधिकार आहे. पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आणि यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी अरेरावी सुरु आहे. त्यावरही तुम्ही सणकून बोललचं पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या महाराष्ट्र -कर्नाटक प्रश्नावरील भूमिकेची वाट पाहतोय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
तसेच समृद्धी महामार्ग होणार तो झालाच पाहिजे. माझी राजधानी आणि उपराजधानी जवळ आणणारा तो महामार्ग आहे. त्याचं काम आमच्या काळात आम्ही अधिक वेगानं केलं असून ते रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत. पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना कर्नाटकनं महाराष्ट्राचे रस्ते बंद केले असतील तर पंतप्रधान म्हणून त्यांना काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार असाल ते आधी सांगा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना सुनावलं आहे.
या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा