वेगवान नाशिक
सध्या नोकरदारांसाठी अनेक भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी या बॅंकेत नोकरीसाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
तसेच SBI SCO भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली असून पात्र उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलं जाईल. चला तर जाणून घेऊया या भरतीबाबत सर्व माहिती.
या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा
या जागांसाठी भरती- डेप्युटी मॅनेजर पदासाठी १६ जागांवर भरती होणार आहे. तर सीनिअर एग्झिक्युटिव्ह १७ जागा, एग्झिक्यूटीव्ह २ जागा, एग्झिक्युटिव्ह २ जागा, सीनिअर स्पेशनल एग्झिक्युटीव्ह १ जागा, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर १ जागा, असिस्टंट डेटा ऑफिसर १ जागा, सीनिअर क्रेडिट स्पेशालिस्ट १६ जागा अशी रिक्त जागांची संख्या ५४ इतकी असणार आहे.
याकरता उमेदवारांना जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी विभागासाठी ७५० रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेवादारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तसेच यासाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला बॅंकेच्या दिलेल्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले हे निर्देश