बीसीसीआयने भारतीय संघाबाबत घेतला हा मोठा निर्णय


वेगवान नाशिक

मुंबई: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर २ कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत. तसेच भारतीय संघामधील दुखापतींमुळे महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर गेल्यामुळे संघामध्ये पुन्हा बदल होताना दिसत आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  एक धक्कादायक निर्णय घेतला असून त्यांनी या मालिकेसाठी सिनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी एका खेळाडूचा समावेश केला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता

दरम्यान क्रिकबझच्या बातमीनुसार, त्याच्या जागी कसोटी संघात ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. २०१० मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. जयदेवच्या नेतृत्त्वाखाली सौराष्ट्र संघाने यंदाचा विजय हजारे चषक दुसऱ्यांदा आपल्या नावे केला आहे.

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, या तारखेपूर्वी होण्याची शक्यता

 जयदेव उनाडकट हा विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये सौराष्ट्र संघाचा कर्णधार होता. या स्पर्धेत त्याने 10 सामन्यांत एकूण 19 बळी घेतल्या असून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या शानदार खेळानंतरच त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

तसेच जयदेव उनाडकट हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. उनाडकटने त्याच्या ९६ सामन्यांच्या कारकिर्दीत ३५३ बळी घेतल्या आहेत. ज्यामध्ये रणजी ट्रॉफीच्या 2019-20 च्या विक्रमी हंगामाचाही समावेश आहे. ज्यामध्ये त्याने ६७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

जीएसटी आणि इतर निधी संकलनावरून शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *