वेगवान नाशिक
नवी दिल्लीः सध्या थंडीचे दिवस सुरू आहे. त्यामुळे या दिवसात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतो. त्यात थंड वातावरणामुळे भूक जास्त लागते आणि त्यामुळे आपण काही ना काही खात असतो. परंतु आरोग्याच्या दृष्टीने खाण्या-पिण्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असते. म्हणजे सकस आणि समतोल असा आहार या दिवसांत घेतला गेला पाहिजे. चला तर या दिवसात चांगले आरोग्य राखायचे असेल तर रात्री कोणते पदार्थांचे सेवन करणे टाळावे हे जाणून घेऊया.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता
फळे- थंड वातावरणात रात्री आंबट फळे खाणे टाळावे. हिवाळ्यात आंबट आणि थंड प्रकृतीची फळे अजिबात खाऊ नका. रात्रीच्या वेळेस लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने ॲसिड रिफ्लेक्स होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच रात्रीच्या वेळेस थंड प्रकृतीची फळे खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.
या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना 10 वर्षात दिला जबरदस्त परतावा
मसालेदार जेवण- हिवाळ्याच्या दिवसात मसालेदार अन्न कमी खावे, विशेषतः रात्रीच्या वेळेस त्याचे कमी सेवन करावे. रात्री मसालेदार अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कच्च्या भाज्या- हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस टोमॅटो, गाजर, मुळा, कांदा अशा कच्च्या भाज्या खाणे योग्य नाही. कच्च्या भाज्यांमुळे पोटात गॅस तयार होतो. रात्रीच्या वेळेस आपला पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्म यांचे कार्य मंद गतीने होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी पचण्यास जड अशा कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
तळलेले अन्न- रात्रीच्या वेळेस तळलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. रात्री पचनक्रिया मंद होते, त्यामुळे पचण्यास जड असे तेलकट अथवा तळलेले पदार्थांचे गोष्टींचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच आपले वजनही वाढू शकते. कॅफेनयुक्त पदार्थ- थंडी असो किंवा उन्हाळा रात्रीच्या वेळेस कॅफेनयुक्त पदार्थ अथवा पेयांचे सेवन करू नये. कॅफेनयुक्त पदार्थ खाल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या पदार्थांमध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते ज्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते.
चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या त्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या या नेत्याची जोरदार टीका