राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसलेंचे थेट पंतप्रधानांनाच पत्र


वेगवान नाशिक

नवी दिल्ली: खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिलं असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

दरम्यान  २३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे, याबाबत पत्र लिहिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर त्यांना पत्र गृहमंत्रालयाकडे पत्र पाठवले आहे. तर आज पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवलं असून या पत्रात कोणत्याही राज्यात घडणारा एखादा प्रकार इतका वाढू नये की, ज्यामुळे तेढ निर्माण होईल, अशी मागणी केली असल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी

तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची अस्मिता आहे. त्यामुळे शिवरायांबद्दल प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. कारण सध्या राज्यपाल पदावर भगतसिंग कोश्यारी आहेत. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते. तसेच, राज्यात राज्यापाल हे पद फार मोठे असते. या पदावर असताना त्यांनी शिवरायांबद्दल असे विधान करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. अशी आम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे. त्यामुळे लवकरच या मागणीनंतर पंतप्रधानांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल”, असेही उदयनराजे म्हणाले आहे.

या चार सरकारी विमा कंपन्यांचे LIC मध्ये होणार विलीनीकरण

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *