वेगवान नाशिक
राज्यात सध्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू असून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यात राज्यपालांच्या विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चा देखील आयोजित केला आहे. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असून “भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे असं म्हटलं आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. त्यांनी भीक नाही मागितली. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
याबाबत चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटीलही महापुरुषांवर बोलतांना केलेले विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी