वेगवान नाशिक
सध्या राज्यात शिक्षणाचा दर्जा ढासळताना दिसत आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यामुळे आता प्रशासनाकडून एक निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणूनच यापुढे आता शिक्षकांना देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
याबाबत प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आल असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रकर म्हणाले आहे. तसेच ते पुढे म्हणाले शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झाला नाही असे आमचं मत असून शाळेत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतला असल्याचं केंद्रकर म्हणाले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
तसेच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं केंद्रकर म्हणाले. त्यात सध्या आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहे.
चाणक्य नितीः स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा…