या चार सरकारी विमा कंपन्यांचे LIC मध्ये होणार विलीनीकरण


वेगवान नाशिक

देशात  आता खासगी क्षेत्रातील लोकांना एलआयसीमध्ये अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे. कारण 66 वर्षात पहिल्यांदाच LIC खासगी अध्यक्षाच्या हातात असेल. सध्या देशातील चार सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या एलआयसीमध्ये विलीन होऊ शकतात. यामध्ये नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा समावेश आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

दरम्यान याबाबत विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 आणि विमा कायदा 1938 अंतर्गत त्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्यानुसार, LIC मध्ये चार सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. या प्रस्तावित सुधारणांमध्ये असे म्हटले आहे की देशात जीवन आणि जीवनेतर विमा पॉलिसी विकण्यासाठी एकच मान्यताप्राप्त कंपनी असावी, जी विमा नियामकाला किमान आवश्यक भांडवल निर्धारित करुन वैधानिक मर्यादा काढून टाकण्यास मदत करेल. त्यात आणखी एक कृषी विमा कंपनी विलीन केली जाऊ शकते, अशीही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधी घोषणा केली होती की धोरणात्मक क्षेत्रांच्या बाबतीत फक्त चार कंपन्याच सरकारी असू शकतात. त्यामुळे सरकार आपल्या चार नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण करु शकते. त्यातच दुसरीकडे आता खासगी क्षेत्रातील लोकांना एलआयसीमध्ये अध्यक्षपदाची संधी मिळणार असून विशेष म्हणजे की, 66 वर्षात प्रथमच घडत आहे.

चाणक्य नितीः स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा…

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *