वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजनेची कार्यारंभ आदेश प्रत ( Work Order) आमदार सुहास कांदे यांच्या मार्फत या योजनेचे कॉन्ट्रॅक्टर इगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांच्याकडे सोपवली.सोबतच 78 खेडी (56 मूळ आणि नवीन 22 गावांचा समावेश) पाणीपुरवठा योजनेची कार्यारंभ आदेश प्रत देखील स्वीकारली.
याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांच्यासह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे मुख्यमंत्री निवासस्थानी उपस्थित होते.
सदर योजना पूर्ण करण्यासाठी शासकीय कालावधी 30 महिन्यांचा असला तरी आमदार सुहास कांदे यांनी हेच काम 17 ते 20 महिन्यात पूर्ण करून घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनमाड येथे लवकरच संपन्न होणार आहे.
मनमाड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावत असतानाच आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरात उद्योग व्यवसायाला चालना मिळावी म्हणून एमआयडीसीसाठी होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू ठेवले आहेत.पाण्याची उपलब्धता होण्यापूर्वी एमआयडीसी साकारण्याचा निर्धार देखील त्यांनी केला आहे.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, संग्राम बच्छाव,महेंद्र दुकळे,राजाभाऊ भाबड,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,पंकज निकम,मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे,भाजपा जिल्हा संघटक नितीन पांडे, शहर प्रमुख जय फुलवाणी,युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान,उपजिल्हाप्रमुख सुरेश शेलार,ज्ञानेश्वर कांदे,धनंजय कांदे,महावीर ललवाणी,भरत पवार,आबा देवरे,नारायण पवार,एकनाथ बोडके,महेश बोराडे आदी उपस्थित होते.