वेगवान नाशिक
मुंबईः महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यात पाऊस काही पिच्छा सोडायचे नाव घेईना. त्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाल्याने ढगाळ वातावरण रहाणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
त्यात आधीच अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यावर पुन्हा संकट येऊन ठेपले आहे.
तसेच हवामानात सातत्याने बदल होत असल्याने राज्यात ११ ते १४ डिसेंबरदरम्यान पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढाल चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
37 वर्षांची ‘प्रथा’ मोडण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं;
दरम्यान या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खान्देश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बेतुल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला व छत्तीसगडच्या काही भागापर्यंत जाणवू शकतो. तर राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, गोवा किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसू शकतो. तर, विदर्भही या हिवाळ्यातील पावसामुळं ओलाचिंब होणार राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.असे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्याच येत आहे.
गुजरात निकालावर शरद पवार काय़ म्हणाले…”