नाशिकः धक्कादायक! एका बापाचा आपल्याच मुलीवर सात वर्षे बलात्कार


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात सध्या सातत्याने धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. अशातच ह्दयाला पिळवटून टाकणारी संतापजनक अशी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरास घडली असल्याचं समोर आलं असून एका बापाने सख्ख्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड परिसरातील डीजीपीनगर मध्ये रहाणा-या एका कुटुंबातील पित्याने आपल्याच मुलीला तब्बल सलग सात वर्षे अत्याचार सुरू होते. बदनामी होऊ नये  म्हणून पीडित मुलीला पित्याकडून धमकी दिली जात होती.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी

याबाबत  पीडित मुलीने अत्याचाऱ्याच्या वेदना असह्य झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात  घरी कुणीही नसल्याचा फायदा संशयित पित्याने घेतल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. तसेच  2016 पासून 2022 पर्यन्त अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हंटले असून त्यावरून अंबड पोलीसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील नराधम पित्याला अंबड पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

चाणक्य नितीः स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा…

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *