Nashik एका महिलेच्या पर्समधून ४ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने केला लंपास


वेगवान नाशिक

नाशिकः शहरात एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात महिलेच्या पर्समधून ४ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया नंदकुमार कुलथे (४६,रा.वृंदावन नगरी,ठाकरे मळा, सावतानगर, हिरावाडी, पंचवटी) या दि ७ रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला धनदाई लॉन्स येथे गेल्या होत्या.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

त्यादरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये ७० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन असा ४ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. त्यावेळी कुलथे यांनी पर्स त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर ठेवली असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर पर्स त्यांची नजर चुकवून लंपास केली.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता शेळके करत आहेत.

राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसलेंचे थेट पंतप्रधानांनाच पत्र


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *