वेगवान नाशिक
सध्या संपूर्ण समाजाला भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेनं काम करायचं असून संपूर्ण जगाला एकत्र आणण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण भारताला G20 चं अध्यक्षपद मिळणं ही सामान्य गोष्ट नसून याबाबत कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, आज संपूर्ण जग भारताकडं एका चांगल्या उद्देशानं पाहत आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
त्यामुळे एखादी व्यक्ती कोणतीही भाषा बोलत असली, तरी कोणत्या धर्माचं पालन करते किंवा ती नास्तिक असली तरी देशाला आपलं मानते, ती हिंदूच आहे, असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
भागवत म्हणतात, भारतातील लोकांना विविधतेत एकतेच्या संस्कृतीत राहायचं आहे आणि या दिशेनं प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचा आणि भाषेचा अभिमान असला पाहिजे. परंतु, भारतीयांनी संघटित होऊन भारताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आम्ही आरएसएसच्या स्वयंसेवकांना हेच शिकवतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच जगाला आता भारताची गरज असून भारताचं नाव जागतिक चर्चेत असून भारत जगाचं नेतृत्व करण्यास तयार आहे. त्यामुळे आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा असून संपूर्ण समाजाला भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेनं काम करायचं आहे, असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.
या चार सरकारी विमा कंपन्यांचे LIC मध्ये होणार विलीनीकरण