राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण


वेगवान नाशिक

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वातावरण तापलेले असताना कोश्यारी यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात आणखी एक विधान केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषणासाठी उभे राहीले असता  भाषण सुरु होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवत त्यांना ‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असे म्हणत तक्रार मांडली. या घडल्या प्रकाराला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो ’ असं वक्तव्य केलं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा

तसेच एवढचं नव्हे. तर भाषण सुरू असताना राज्यपाल कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना देखील बाजूला व्हायचे आदेश दिले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने तर्कवितर्क लावले जात असून यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चाणक्य नितीः स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा…

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *