वेगवान नाशिक
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय देखील सांगितले आहेत. तसेच वेळ आणि माणूस कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी स्त्री पुरुषां विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की स्त्री पुरुषांनी आपल्या गोष्टी कधीच कुणासमोर सांगू नये नाहीतर याने भविष्यात त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी कोणत्या आहेत.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
आर्थिक नुकसान- आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जर तुमचं नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नका. कारण लोक याबाबत समोर दु:ख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात मात्र आनंदी असतील. तसेच तुमच्या मागेच बोलत बसतील. त्यामुळे पैशाचे नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका. अन्यथा लोकं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.
चारित्र्य- आचार्य चाणक्य यांच्या मते विवाहानंतर स्त्री-पुरुषांनी एकमेकांबद्दल आदर ठेवला पाहिजे. एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे. यासोबत कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपापसात सोडवावी. यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम वैवाहिक जीवनात पडू शकतो. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईल असं नाही. वेळ आल्यावर ती तुमची चेष्टाही करू शकते.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढणार?
बदनामी- आचार्य चाणक्य यांच्या मते जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर ते कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते. म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका.
गुजरात निकालावर शरद पवार काय़ म्हणाले…”