वेगवान नाशिक
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सुमारे १.१ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या दिल्या असून प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करुन प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे मार्गातील झाडे. ही झाडे तोडण्याची परवानगी नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेडने हायकोर्टाकडे मागितली होती. तर अडथळा ठरणाऱ्या तब्बल २१ हजार ९९७ खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
याबाबत मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी रेल कॉर्पोरेशनला सात अटींच्या अधीन राहून हा प्रकल्प पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. त्यात मुंबई, पालघर आणि ठाण्यातील जवळपास २०,९९७ खारफुटीची झाडे तोडण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला हा मोठा दिलासा दिला आहे.
चाणक्य नितीः स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा…