वेगवान नाशिक
गेल्या दोन वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. मात्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पगाराच्या थकबाकीपोटी २०० कोटी रुपये मंजूर केल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता 200 कोटी रुपये मंजूर झाल्याने पगाराची चिंता दूर झाली आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
दरम्यान, मार्च 2020 पासून कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाऊननंतर एमएसआरटीसीला त्यांच्या 93,000 कर्मचार्यांचे पगार देण्यासाठी सरकारने महाविकास आघाडी सरकारकडून 3,000 कोटींहून अधिक रक्कम जारी केली होती. तसेच अलीकडेच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ‘ऐतिहासिक’ वेतनवाढीची घोषणा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
आजचे राशीभविष्य: या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा
मात्र यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे MSRTCला ६०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2022 चे पगार थांबले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला होता. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेत पगारासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीतून वितरित करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंदूंबाबत मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले..