वेगवान नाशिक
मुंबई : दिल्लीतील मेहरौली येथे तिच्या लिव्ह-इन पार्टनरने खून केलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर विकास वालकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘सर्वप्रथम मी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि डीसीपी दक्षिण यांचे आभार मानतो की त्यांनी मला नक्कीच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही आम्हाला न्यायाचे आश्वासन मिळाले आहे. मुलीच्या हत्येमुळे आमचे कुटुंब अतिशय दु:खी झाले आहे. वसई पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या कुटुंबीयांना हा त्रास सहन करावा लागला आहे. जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. असा आरोप श्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला आहे. तसेच आफताबने माझ्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.अशी मागणी केला आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी
त्यानंतर विकास वालकर म्हणाले, ‘माझा कायद्यावर विश्वास आहे. दिल्ली पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. तरीही वसई पोलीस आणि नालासोपारा पोलिसांनी तपासात दिरंगाई केली. त्यामुळे मला अडचणी येत होत्या. पण मला आशा आहे की तुम्ही लोक माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मला मदत करत राहाल. तसे या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आफताब पूनवालाने माझ्या मुलीला मारले तसाच धडा मला अपेक्षित आहे.
हिंदूंबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान; म्हणाले..