वेगवान नाशिक
मुंबई : सध्या देशात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा
सध्या उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा अस्तित्वात असून लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असेही कायद्यात आहे.
हिंदूंबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान; म्हणाले..
तसेच यामध्ये पीडित मुलगी जर 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्याचबरोबर कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे.
तर येत्या हिंवाळ अधिवेशनात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून हे विधेयक अधिवेशनात मांडलं गेल्यास अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पुन्हा पाऊस, या तारखेला बरसणार सरी