वेगवान नाशिक
मागील काही दिवसांआधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी हायकोर्टात दाखल केली होती. तर त्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली असून कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
तर याबाबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.
दरम्यान ही याचिका सुनावणीस योग्य नसल्याचा युक्तीवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात सामना या मुखपत्राच्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरुनही या याचिकेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल देखील विचारण्यात आला होता. त्यामुळे उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडेंनी केली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
गौरी भिडे यांच्या या याचिकेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले असून आज न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.
राज्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे संकेत