गुजरात निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? काय म्हणाले एकनाथ शिंदे


वेगवान नाशिक

नुकतीच गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली असून  निकालात भाजपाला दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

यावर  पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचं सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असून आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.

एचडीएफसीनंतर आता या सरकारी बॅंकांच्या व्याजदरात वाढ

त्यात त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदललं. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. म्हणूनच आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिलं असून लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल, असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलंयं

तसेच मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब असून महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली असल्याचं एकनाथ शिंदेंनी नमूद केल आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *