वेगवान नाशिक
मुंबई : पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गोंधळामुळे गरीब खातेदारांचे मोठे नुकसान झाले असून, गरिबांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत करता यावेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
दरम्यान बॅंकेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली तरीही त्या परत मिळण्याची शक्यता नव्ह्ती, त्यामुळे या ठेवींमधून घेतलेल्या ३९ मालमत्ता गृह विभागाने जप्त केल्या आहेत. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेल्या जागा सिडकोने खरेदी करुन ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा एक पर्याय असून त्या दृष्टीने या जागांचे सिडकोने मूल्यांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले.
आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात
तसेच ठेवीदारांची सुमारे ६११ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देणी असून हे सगळे गरिबांचे पैसे आहेत, ते त्यांना मिळालेच पाहिजेत, त्यासाठी जप्त मालमत्तांचा लिलाव करा, वसूली करा आणि हे पैसे परत करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या आहेत.
या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज