या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली, जी अंदाजानुसार होती. रिझर्व्ह बँकेच्या दरवाढीनंतर, पॉलिसी रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो ऑगस्ट 2018 नंतरचा उच्चांक आहे. यासह, FY2023 मध्ये रेपो दरात आतापर्यंत एकूण 225 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे. त्यामुळे  रेपो दरात या वाढीनंतर बँका विविध प्रकारच्या कर्ज आणि ठेवींच्या उत्पादनांवर व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात

तर  सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांच्या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर, ऑक्टोबर 2022 मध्ये भारताची किरकोळ किंमत महागाई 6.77 टक्क्यांपर्यंत कमी झाली, ज्यामुळे RBI ने सप्टेंबरच्या धोरणात रेपो दर 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवला. यासोबतच, आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज 6.7 वर कायम ठेवला आहे.

यामध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढून 2.26 टक्के झाला आहे. या बँकेत 6 डिसेंबरपासून नवीन व्याजदर लागू होणार आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या FD वर सामान्य लोकांच्या तुलनेत 9.26 टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. त्याच वेळी, बँक सामान्य लोकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्तीत जास्त 9.01 टक्के व्याज देत आहे.

आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात

याशिवाय, बँकेने 15 दिवसांच्या कालावधीसह 5 वर्षांची FD देखील सुरू केली असून या मुदत ठेवी अंतर्गत, बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.01 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.26 टक्के व्याज देत आहे. तसेच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचा ठेव व्याजदर देखील 21 नोव्हेंबर 2022 पासून बदलण्यात आला आहे. त्यात बँक 181 आणि 501 दिवसांच्या दोन विशिष्ट मुदत ठेवींसाठी सामान्य नागरिकांसाठी 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 टक्के व्याजदर देत आहे.

एलआयसीच्या या तीन योजना गुंतवणूकदारांना देतेय जबरदस्त परतावा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *