वेगवान नाशिक
सध्या गुजरातच्या निवडणुका पार पडल्या असून आज निकाल लागला आहे. त्यात भाजपाला घवघवीत यश मिळताना दिसत असून १५८ जागांसह आघाडीवरती आहे.तर, काँग्रेसला केवळ १६ जागांवरती आघाडीवर असल्याचं दिसत आहे. या लागलेल्या निकालावरून संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केला होता.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
त्यानंतर संजय राऊत म्हणाले होते, गुजरातचा निकाल अपेक्षितच असून तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच अटीतटीची लढाई झाली असती. पण, बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं आप आणि भाजपात झालं असावं, अशी लोकांना शंका आहे.
ब्रेकिंग, महाराष्ट्रतील मुंबई शहरातील 3 प्रमुख स्टेशन उडवण्याची धमकी
त्यावरून भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं असून “हिमाचलचा संपूर्ण निकाल अजून हाती यायचा आहे. गुजरातमध्ये सातव्यांदा बहुमत घेऊन सरकार स्थापन होईल, असं दिसत आहे. जेव्हा हा विक्रम होतो. तेव्हा काही लोकांच्या पोटात मुरडा येतोच आणि त्याचा आवाज आपण बघत आहोत, असा खोचक टोला शेलार यांनी विरोधकांना लावला आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय