वेगवान नाशिक
नाशिकः शहरात सध्या अनधिकृत होर्डिंग गर्दी वाढू लागली असून चौकाचौकात अशी होर्डिंगबाजी दिसून येत असल्याने मनपाने पुन्हा एकदा कारवाईचा पाऊल उचलले आहे. त्यासाठी शहरात आता नवी नियमावली जाहीर केली असून 14 डिसेंबरनंतर अनधिकृत होर्डिंग आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
तसेच शहरातील होर्डिंग्जवर आता क्यूआर कोड अनिवार्य होणार आहे. तर या सर्वांसाठी येणारा खर्चही संबंधितांकडून वसूल करणार असल्याचे उपायुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले.
दरम्यान नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगमुळे होणाऱ्या विद्रूपीकरणाची समस्या लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका दाखल होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग हटवणे व लावणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईच्या आदेश दिले, मात्र त्याचे पालन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून झाले नसल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
त्यात शहरात सध्या खाजगी जागांवर 832 पेक्षा जास्त होर्डिंग्ज आहेत, तर मनपाने केवळ 28 जागा खाजगी संस्थांना होर्डिंगसाठी भाड्याने दिल्या आहेत. त्यानुसार आता मनपा व खाजगी जागेत होर्डिंग लावण्याबाबतचे ठिकाणे तसेच भाडे ही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या जागा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी लावली जाणारी होर्डिंग व फलक अनधिकृत मानून कारवाई केली जाणार आहे.
या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज