Nashik मुंबई आग्रा महामार्गावर अपघात, दोनजण गंभीर जखमी


वेगवान नाशिक

नाशिकः जिल्ह्यात सध्या सातत्याने अपघाताच्या घटना घडताना दिसत आहे. अशातच मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा

याबाबत माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून चांदवडकडे (क्र  NL 01 0213)  मालवाहतूक कंटेनर जात असतांना शिरवाडे ते खडकजाब दरम्यान पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास व्यंकटराव हिरे आश्रम शाळेसमोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कंटेनर पलटी होऊन अपघात  झाला आहे.या अपघातात चालक हरवंत चरण सिंग डीलस आणि क्लीनर दिलीप कुमार पवार हे दोघे गंभीर  जखमी झाले आहे.

या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज

याबाबत माहिती मिळताच शिरवाडे वडनेर चौफुलीवरील नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना चांदवड  येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे निर्देश


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *