नाशिकः चार वर्षीय मुलाचा ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिक  : शहरातील खर्जुल मळा परिसरात एका चार वर्षाच्या मुलाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून अमित करंजीलाल धुर्वे असं मयत मुलाचे नाव आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा

याबाबत माहिती अशी की, मृत अमित हा सायंकाळी साडेतीन वाजता  वडिल करंजीलाल धुर्वे यांच्या सायकलवरून घरी जात असताना खर्जुल मळ्यातील जगदंबा आर्ट्स या मूर्ती कारखान्याजवळ  समोरून रेल्वे मालधक्का येथून शिंदे गावाकडे सिमेंट घेवून जाणारा आयशर ट्रक आला. त्यादरम्यान धुर्वे यांच्या सायकलचा तोल गेल्याने आयशर ट्रकला धक्का लागल्यामुळे सायकल ओढली गेल्याने उलट दिशेला फिरून खाली पडली. त्यामुळे सायकलवर पुढील दांडीवर बसलेला अमित हा आयशर ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने चिरडून त्याचा मृत्यू झाला आहे.

आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात

सदर घटनेत अपघातस्थळी पडलेला अमितच छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह बघून जमलेल्या गर्दीतील अमितच्या आईने दृश्य बघून आर्त टाहो फोडला व त्यादेखील बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आयशर ट्रकचालक वाहनासह फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *