वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात या वादावरून राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यावरून शंभुराज देसाई यांनी आपल्या तोंडाला आवर घालावा. अन्यथा त्यांना पुन्हा आत जावे लागेल”, असा इशारा राऊतांना दिला.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
या इशा-यानंतर संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत असून दिवसभरात धमकीचे दोन फोन आल्याचे समजते. याबाबत मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
दरम्यान राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्य सरकारमधील मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र त्यांनी दौरे रद्द केले. त्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शंभुराज देसाई यांचीही पत्रकार परिषद झाली. यावेळी शंभुराज देसाई यांनी संजय राऊत साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते जामिनीवर असून निर्दोष सुटलेले नाहीत. असं म्हणत इशारा दिला होता. त्यामुळेच राऊतांना धमकीचे दोन फोन आले असून फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे संकेत