ब्रेकिंग! नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात, चारजण ठार


वेगवान नाशिक

नाशिकः नाशिक-सिन्नर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील शिंदे पळसे टोलनाक्यावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून तीन वाहनांची भीषण टक्कर झाली. त्यात एका एसटी बसने 3-4 वाहने उडवली. यानंतर बसने पेट घेतला.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा

सदर घटना गुरुवारी दुपारी घडली असून बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सध्या बतचावकार्य सुरू असून या अपघातात  १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

दरम्यान  नाशिक शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला असून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *