वेगवान नाशिक
मुंबई : महाराष्ट्रात सध्या पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यात आता तृतीयपंथीयांच्या पोलिस भरतीचाही मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाने मत व्यक्त केले असून पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना डावलणं अयोग्य असल्याचे म्हटलं आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
तसेच मुंबई हायकोर्टाने भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावं असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे पोलीस भरतीत लवकरच तृतीयपंथीयांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत मॅटनं दिलेल्या आदेशाच्या बाजूनं हायकोर्टानं मत व्यक्त केल असून मॅटच्या आदेशाविरोधात सरकारनं कोर्टात धाव घेतली. तेव्हा हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारल आहे. त्यात पोलीस भरतीत केवळ धोरण नाही म्हणून तृतीयपंथीयांना डावलणं अयोग्य आहे, असं कोर्टानं सांगितले. तसेच गृह विभागात भरती प्रक्रियांमध्ये तृतीयपंथीयांनाही स्थान मिळायलाच पाहिजे असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान मांडले आहे.
या बँका ज्येष्ठ नागरिकांना देतेय FD वर 9% पेक्षा जास्त व्याज
दरम्यान मॅटच्या तृतीयपंथी यांच्या संदर्भातला निर्णय विरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीची सुनावणीसाठी राज्य सरकार तर्फे विनंती करण्यात आली असून गृह विभागाच्या अंतर्गंत येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवणं अनिवार्य करा.
आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात