वेगवान नाशिक
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकारणातील सर्वच चित्र बदलताना दिसत आहे. त्यात एकीकडे महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांवर मुंबई महापालिका येऊन ठेपली असून शिवसेनेला राज्य सरकारमधून पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस भाजप-शिंदे गटाचा असल्याचं बोललं जात आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
दरम्यान मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटानं चांगलीच कंबर कसली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली.
या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवली गेली असल्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत मिळत आहेत.
आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात