वेगवान नाशिक
मुंबई : सध्या अनेक बॅंका आपले व्याजदर वाढवताना दिसत आहे. त्यामुळे सामान्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता एचडीएफसीपाठोपाठ बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज, या सरकारी बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे बँकेचे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार करणे टाळा
दरम्यान आरबीआयने रेपो दर ०.३५ टक्के वाढवल्यामुळे रेपो दर आता ६.२५ टक्के झाला आहे. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागणार आहे. तसेच ग्राहकांवरील ईएमआयचा बोजा आणखी वाढणार आहे. याचाच परिणाम दिसून येत असून आता बँक ऑफ इंडियाने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ०.३५ टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ९.१० टक्के झाला असून नवे दर ७ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेनेही त्यांचे मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट दर वाढवले आहेत. बँकेने आपला एमसीएलआर ०.१५ ते ०.३५ टक्क्याने वाढवला असून १ वर्षाचा एमसीएलआर ०.२० टक्क्याने वाढवून ८.२५ टक्के केला आहे. तर २ वर्षांचा एमसीएलआर ०.२५ टक्क्यांच्या वाढीनंतर ८.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
तसेच 3 वर्षांचा एमसीएलआर ०.३० टक्के वाढून ८.४० टक्के झाला आहे. ६ महिन्यांचा एमसीएलआर ८.१५ टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८ टक्के, १ महिन्याचा एमसीएलआर ७.७० टक्के आणि रात्रीचा एमसीएलआर ७.६५ टक्के झाला आहे. त्याच वेळी बँकेचा RLLR देखील ९.१० टक्के झाला आहे.
आज भारतीय शेअर बाजारात तेजीने सुरूवात