वेगवान नाशिक
नवी दिल्ली : LIC चे अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना मालमाल केले असून गेल्या 20 वर्षांत या म्युच्युअल फंड योजनांनी 18.50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते
देशातील सर्वात मोठी सरकारी विमा योजना म्युच्युअल फंडातही व्यवसाय करते. विमा कंपनीची म्युच्युअल फंड योजनेत गेल्या 20 वर्षात 10 टक्के ते 16 टक्क्यांचा वार्षिक फायदा झाला आहे. एक लाख गुंतवणूक करणाऱ्यांना 18.70 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.
तसेच LIC MF Large Cap Fund ने 20 वर्षात जवळपास 15.76% परतावा दिला असून या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 18.70 लाख रुपये इतकी झाली. ज्यांनी या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची SIP केली. त्यांना 1.10 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच या योजनेत कमीत कमी एकरक्कमी 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 1,000 रुपयांची SIP करता येते.
या बॅंकेच्या रेपो व्याज दरात एवढ्या टक्कयांनी वाढ, तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम
LIC MF Tax या प्लानने 20 वर्षांत साधारणपणे 14 टक्क्यांचा परतावा दिला असल्याने या योजनेत एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 13.75 लाख रुपये मिळाले. तसेच LIC MF Flexi Cap फंडने 20 वर्षांत जवळपास 12.85 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत एक रुपये गुंतवणूक केली असती तर परताव्यासह ही रक्कम 11.20 लाख रुपये झाली असती. ज्यांनी दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी केली. त्यांना 20 वर्षांत 81,89,994 रुपये मिळाले.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी