वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळा असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकात उमटत असून काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यावरून संजय राऊत यांनी ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि मुख्यमंत्री आहेत कुठे या सर्व वादामध्ये, असा उपस्थित केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते
तसेच, हो हे सरकार नामर्दच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला असून यासोबतच तीन महिन्यांपासून या सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं केलंय, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
या बॅंकेच्या रेपो व्याज दरात एवढ्या टक्कयांनी वाढ, तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम
त्यानंतर राऊत म्हणाले की, या सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं सीमाभागांत सरकारी प्रेरणेनं जे काही सुरु आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील वाहानांची तोडफोड होत आहे. हल्ले होत आहेत आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करुन तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? काय चाललंय? असं म्हंणत सडकावून टिकास्त्र झाडलं आहे.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी