वेगवान नाशिक
नाशिक : शहरातील वावरे नगर तिडके कॅालनीत तब्बल साडेपाच लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, योगिता घनशाम यशवंतराव (रा. वावरे नगर, तिडके कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरात पार्टी करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच ऐवज लंपास केला असल्याचं सांगितलं जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते
दरम्यान दि १ रोजी रात्रीच्या वेळेस योगिता यांच्या घरात पार्टी असल्याने संशयित प्रियांका कैलास पवार (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड), तेजस रावसाहेब पगारे (रा. एबीबी सर्कल) आणि विशाल एकनाथ घन (रा. सावतानगर, सिडको) हे तिघे त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी पार्टी सुरु असताना दोन वेळा योगिता या तेजससोबत बाहेर गेल्या असून पहाटेपर्यंत पार्टी चालल्याने दि २ रोजी संशयितांनी घर सोडले.
त्यानंतर दि.३ रोजी योगिता यांनी गळ्यातील सोन्याची चेन घालण्यासाठी कपाट उघडले असता त्यांना कपाट रिकामे असल्याचे आढळले. यासंदर्भात त्यांनी तिघा मित्रांकडे चौकशी केली असता, कोणीही माहिती न दिल्याने त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत दागिने व रोकड चोरीचा संशय व्यक्त करताना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी
यामध्ये दोन लाख ७१ हजाराच्या सोनसाखळ्या, एक लाख १३ हजार ८२५ रुपये किमतीच्या ८ अंगठ्या, ३६ हजार रुपयांचे मूल्याची कर्णफुले, ७५ हजार रुपयांचे ब्रेसलेटसह अन्य दागिने आणि साठ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण पाच लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचं गुन्हा्यात दाखल करण्यात आले असून पुढिल तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत.
एलआयसीच्या या तीन योजना गुंतवणूकदारांना देतेय जबरदस्त परतावा